Sand Booking Online Maharashtra : नागरिकांसाठी आनंदाची बातमी, नागरिकांना आता फक्त ६०० रुपयामध्ये प्रती ब्रास मिळणार आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे.
Sand Booking Online Maharashtra
वाळू बुकिंग (Sand Booking) करण्यासाठी नागरिकांना महाखनिज https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड, रेशन कार्ड, PAN कार्ड, एक फोटो, मोबाईल क्रमांक इ. माहिती कागदपत्रे असणे गरजेचे आहे. तरच ऑनलाईन अर्ज करता येईल. नागरिक मोबाईलवरूनसुद्धा अर्ज करू शकतात किंवा जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता.
Online Sand Booking Maharashtra
प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला वाळूसाठी बुकिंग करता येणार आहे. यामुळे सर्व प्रथम प्रोफाईल भरणे गरजेचे आहे. तसेच STOCKYARD DETAILS चेक करावे. आपण https://mahakhanij.maharashtra.gov.in/sandbooking/ हि साईट ओपन करा मेन्यूमध्ये तुम्हाला STOCKYARD DETAILS हा पर्याय दिसेल त्यवर क्लिक करून आपण जिल्ह्यामध्ये डेपो, तसेच वाळू शिल्लक आहे का हे पाहू शकता.
वाळूसाठी बुकिंग {Sand Booking} कशी करावी/अर्ज कसा करायचा याकरिता खालील स्टेप फॉलो करा.
- अर्जदाराने सर्वप्रथम मोबाईल/कॉम्पुटरमध्ये महाखनिज वरती दिलेली साईट ओपन करावी.
- मोबाईल मध्ये साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला मेन्यू/Menu हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.{Sand Booking Online Maharashtra}
- मेन्यूमध्ये तुम्हाला Sand Booking हा ऑप्शन/पर्याय दिसेल तो निवडा.
- त्यानंतर मोबाईल मध्ये नवीन पेज वाळू बुकिंगचे पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी Login या ऑप्शन वरती क्लिक करावे.
- नवीन अर्जदार असल्यामुळे SIGN UP वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपले नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका आणि Submit वरती क्लिक करा.
- मोबाईल नंबर वर एक पाच अंकी ओटीपी येईल तो टाकून Submit घ्यावा करा.
- दिलेल्या मोबाईल नंबरवरती लॉगइन आयडी आणि पासवर्ड येईल.
- पुन्हा तुम्हाला Login पर्यायवरून लॉगइन करा. लॉगइन झाल्यानंतर सर्व प्रथम प्रोफाईल माहिती भरावी लागेल.
- आधार कार्ड, रेशन कार्ड, PAN कार्ड, एक फोटो, इ माहिती तसेच कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
जर आपल्या जिल्ह्यामध्ये डेपो उपलब्ध नसेल तर त्यांना STOCKYARD DETAILS मध्ये सविस्तर माहिती पाहायला मिळेल.