बियाणे, खते, औषधे यासाठी मिळणार अनुदान : MahaDBT Biyane Anudan Yojana
MahaDBT Biyane Anudan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना बियाणे, औषधे, खते इ. खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. लाभ घेण्यासाठी काय करायचे वाचा.
MahaDBT Biyane Anudan Yojana
महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवीत असते. यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. सर्व प्रोसेस हि ऑनलाईन असते. तसेच शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना) अंतर्गत बियाणे सुद्धा दिली जातात, किंवा बियाणांसाठी अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना बियाणे हवे (MahaDBT Biyane Anudan) असल्यास महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे १) आधार कार्ड झेरॉक्स, २) बँक खाते पासबुक झेरॉक्स, ३) शेत जमिनीचा ७/१२, ८अ उतारा इ. कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
बियाणे अनुदान योजना 2024 (Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra)
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून इच्छुक शेतकरी भात, मुग, तूर, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन इ. बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टलवरती शेतकरी योजना या पर्यायामध्ये बियाणे हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तेथून शेतकऱ्यांना बियाणासाठी अर्ज करता येणार आहे.
शेतकरी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात, किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र यांच्या मदतीने शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.