आयुष्मान भारत योजना नवीन रजिस्ट्रेशन ऑनलाईन सुरु : Ayushman Bharat Yojana Registration
Ayushman Bharat Yojana Registration : आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाईन नवीन रजिस्ट्रेशन सुरु झाले आहेत, रजिस्ट्रेशन कुठे करायचे? योजनेची थोडक्यात माहिती, पात्रता, कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.
Ayushman Bharat Yojana Registration
आता आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाने आयुष्मान भारत योजना हि राज्यातील सर्व नागरिकांना लागू केली आहे, आता ज्या कुटुंबाना रेशन धान्य मिळत म्हणजेच ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे. अशा सर्व कुटुंबाना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी “Ayushman bharat card apply online” करता येणार आहे. म्हणजेच प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढता येणार आहे.
कार्ड काढण्यासाठी लाभार्थीचे रेशन कार्ड ऑनलाईन केलेले असणे गरजेचे आहे. योजनेतून लाभार्थींना ५ लाखापर्यंतचा मोफत उपचार (विमा) मिळणार आहे. यासाठी योजनेचे कार्ड बनवावे लागणार आहे. नागरिक मोबाईल वरून ऑनलाईन कार्ड काढू शकतात, किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जावून कार्ड काढू शकतात.
योजना | आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना & महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना |
मिळणारा लाभ | ५ लाख रु पर्यंतचा आरोग्य विमा |
योजनेची अधिकृत साईट | https://pmjay.gov.in/ |
कार्ड काढण्यासाठी | येथे क्लिक करा |
आयुष्मान भारत कार्ड मधून नागरिक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल/रुग्णालयामध्ये लाभार्थीला व कुटुंबाला सामुहिकरित्या वार्षिक ५ लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे. सदर योजने अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी लाभार्थीला कोणतीही रक्कम जमा करावी लागणार नाही.
Ayushman bharat eligibility | आयुष्मान भारत योजना पात्रता
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असेल, राज्यातील ज्या कुटुंबांना रेशन धान्य मिळत आहे म्हणजेचे ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाईन असेल त्या कुटुंबाना, नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड “Ayushman Bharat Yojana Registration” बनवता येणार आहे. राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचे एकच कार्ड बनणार आहे, म्हणजेच नागरीकांना दोन्ही योजनेचे लाभ एकाच कार्डमध्ये मिळणार आहे.
Required Documents Apply Ayushman Bharat Yojana Card
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड काढण्यासाठी लाभार्थी कडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, तसेच रेशन कार्ड व मोबाईल इ. कागदपत्रे माहिती लागेल. मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असेल तर लाभार्थी मोबाईलवरून आपले कार्ड बनवू शकतात. किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जावून आपले कार्ड बनवू शकतात.
मोबाईल वरून कार्ड काढण्यासाठी लाभार्थी https://beneficiary.nha.gov.in/ या साईटवरती नोंदणी केवायसी (ayushman bharat kyc online) करून आपले कार्ड डाऊनलोड करू शकतात.