राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ऑनलाईन अर्ज | Rajya Krushi Yantrikikaran Yojana

Rajya Krushi Yantrikikaran Yojana

Rajya Krushi Yantrikikaran Yojana : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून शेतकऱ्यांना विविध औजारे यंत्र, पप्रक्रिया संच तसेच इतर घटकासाठी योजनेमधून शासकीय अनुदान दिले जाते. या लेखात आपण राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे.

Rajya Krushi Yantrikikaran Yojana

या योजनेमधून शेतकऱ्यांना पॉवर टिलर, Tractor, पॉवरटिलर/Tractor चलित अवजारे, बैल चलित अवजारे/यंत्र, मनुष्य चलित औजारे/यंत्र, काढणी पश्चात तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्र, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे/यंत्र इ. तसेच भाडे तत्वावरील सुविधा केंद्र – कृषी अवजारे बँकेची स्थापना, उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना इ. साठी शासकीय अनुदान दिले जाते. (ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी पहा)

योजनेचे नावराज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
विभागकृषी विभाग
उद्देशकृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ पोहोचविणे
अर्ज कुठे करावामहाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल
Rajya Krushi Yantrikikaran Yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक आहे,
  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  • शेतकऱ्याच्या नावे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक.
  • एखाद्या घटकासाठी/औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक

अर्ज/फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • ७/१२ उतारा
  • ८अ
  • जातीचा दाखला (अनु.जाती, अनु.जमाती साठी)

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश

  • ज्याठिकाणी शेतामध्ये उर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रीकीकरण योजनेचा लाभ पोहोचविणे.
  • प्रात्यक्षिक व मनुष्यबळ विकासाद्वारे सहाभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करणे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *