सर्व योजनांचे पैसे आता फक्त याच खात्यात जमा होणार पहा : Aadhar card bank link status

aadhar card bank seeding

आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कार्ड आहे, आधार कार्ड विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लागते. तसेच कर्ज घेण्यासाठी शैक्षणिक कामासाठी लागते. आधार कार्ड द्वारे आपण पैसे सुद्धा काढू शकतात आता शासकीय योजनाचे अनुदान सुद्धा आधार कार्ड द्वारे लाभार्थी च्या खात्यावर पाठवले जात आहे. यामुळे ज्या बँकमध्ये आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेत योजनांचे अनुदान, पैसे जमा होतील.

खालील योजनांचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक मध्ये जमा होणार

  • प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना
  • नमो शेतकरी महासम्मान निधी योजना
  • संजय गांधी निराधार योजना
  • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
  • महाडीबीटी पोर्टल वरील योजना
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

अशा विविध योजनांचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतात. यामुळे आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर संबधित योजनेचे अनुदान रक्कम जमा होण्यास अडचण येऊ शकते.

आधार कार्ड बँकेत लिंक आहे किंवा नाही हे आपण खालील स्टेप फॉलो करून चेक करू शकता.

  • मोबाईलमध्ये https://www.npci.org.in/ हि साईट ओपन करावी.
  • त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर Product, Consumer, Media etc. हे पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील. यापैकी Consumer या पर्याय वरती क्लिक करावे.
bank seeding
bank seeding
  • त्यानंतर खालील Bharat Aadhar Seeding Enabler (BASE) यावरती क्लिक करावे, त्यानंतर आपल्या समोर नवीन पेज पाहायला मिळेल. त्यामध्ये Aadhar Mapped Status वरती क्लिक करा.
aadhar card link to bank passbook
aadhar card link to bank passbook
  • Enter Your Aadhar खालील बॉक्स मध्ये आधार कार्ड नंबर टाकावा व Enter Above Captcha मध्ये वरील कोड भरून Check Status वरती क्लिक करावे.
aadharcardlinkbank
aadharcardlinkbank
  • आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल. तो टाकून Verify करावा.
aadhar card link bank account status check
aadhar card link bank account status check

Enable for DBT असे असेल तर आपले आधार कार्ड बँकेमध्ये लिंक आहे, तसेच सगळ्यात शेवटी Bank Name म्हणजेच आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे, त्या बँकेचे नाव पाहायला मिळेल. आधार कार्ड बँकेत लिंक नसेल तर आधार लिंक करण्यासाठी DBT Link (NBCI) फॉर्म बँक मध्ये भरून द्यावा, किंवा पोस्ट पेमेंट बँक मध्ये (पोस्टात) बँक खाते काढून घ्यावे.

Similar Posts

Leave a Reply