PM kisan 15th installment date; या तारखेला मिळणार १५ वा हप्ता
PM kisan 15th installment date : अखेर प्रतीक्षा संपली, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. १५ वा हप्ता कधी मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.
PM kisan 15th installment date
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष सहा हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये २७ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात आले होते.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे १४ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांना १५ व्या “PM kisan 15th installment date” हप्त्याचे २००० रुपये मिळणार आहेत. १४ व्या हप्त्याचे २००० रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? हे चेक करावे.
तसेच केवायसी केली आहे का? हे सुद्धा चेक करावे. आपण https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx या लिंक वरती आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारा 8 करोड शेतकऱ्यांना, दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ३:०० वा १५ व्या हप्त्याचे २००० रु DBT द्वारे पाठविले जाणार आहे.