E Chawadi Citizen Portal; नवीन इ चावडी नागरिक पोर्टल पहा

E Chawadi Citizen Portal

E Chawadi Citizen Portal : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी/नागरिकांसाठी इ-चावडी नागरिक पोर्टल हे संकेस्थळ तयार करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची बरीचशी कामे घरबसल्या होणार आहेत.

या लेखामध्ये काय आहे.

E Chawadi Citizen Portal

पोर्टल वरती फक्त काही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामधील सुद्धा फक्त काही तालुके व काही गावांचा समावेश आहे. काही कालावधी नंतर प्रत्येक शेतकऱ्यांना/नागरिकांना हि सुविधा उपलब्ध होणार आहे.

इ चावडी नागरिक पोर्टलच्या माध्यमातून कृषक व अकृषक कर, ७/१२ व त्याबाबत त्रुटी, अधिकृत दंड भरणा इ. सुविधा ऑनलाईन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही.यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

इ-चावडी नागरिक पोर्टलपहा
आपली चावडी पोर्टलपहा
chawadi portal

सदर पोर्टल वरती काही गावातील शेतकऱ्यांना कर ऑनलाईन पाहता येणार आहे. परंतु पोर्टल वरती भरणा हा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये जावून करावा लागणार आहे. भविष्यात ऑनलाईन भरणा सुविधा सुरु केली जाईल अशी सूचना दिलेली आहे.

आपली चावडी पोर्टल हे वेगळे आहे.

Aapli Chawadi आपली चावडी पोर्टल व इ चावडी नागरिक पोर्टल वेगळे आहे. आपली चावडी पोर्टल वरती नागरिकांना गावातील चालू असलेले व्यवहार म्हणजेच खरेदी विक्री फेरफार, चालू फेरफार, मोजणी नोटीस इ. चालू माहिती नागरिकांना पाहता येते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *