फळपिक विमा योजना 2025, विमा भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ : Fal Pik Vima Yojana 2025

Fal Pik Vima Yojana

Fal Pik Vima Yojana 2025 : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी , पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग बहार 2025 मध्ये द्राक्ष, लिंबू, संत्रा व पेरू या पिकाच्या नोंदणीकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी वरील पिकासाठी पिक विमा अर्ज भरू शकतात.

या लेखामध्ये काय आहे.

Fal Pik Vima Yojana

कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटकांमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे आहे. Agristack नोंदणी क्रमांक , आधार कार्ड, बँक पासबुक,जमीन धारणा उतारा,Geo tag फोटो, ई–पिक पहाणी बंधनकारक आहे, ई पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो. ई पीक नोंदणी पिक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै–ऑगस्ट महिन्यात करू शकतात. अधिक माहिती घेण्यासाठी नजिकच्या विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यात फळ पिकांसाठी Fal Pik Vima Yojana2025 विमा अर्ज भरणे सुरु झाले असून शेतकरी जवळील आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन पिक विमासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, पिक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. हि मुदतवाढ पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत मृग बहार २०२५ – द्राक्ष, पेरू, संत्रा व लिंबू इ. फळ पिकांसाठी असणार आहे. वरील पिकांसाठी पिक विमा भरण्यासाठी ३० जून २०२५ हि अंतिम मुदत असणार आहे.

Similar Posts

Leave a Reply