कांदाचाळ DPR डाऊनलोड, कागदपत्रे संपूर्ण माहिती : Kandachal DPR, Documents

Kandachal anudan Yojana DPR

Kandachal DPR report : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध शेतकरी योजना राबिविल्या जातात, शेतकऱ्यांचे कांदा साठवणूक करताना होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी शासन विविध योजना राबवित असते. त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे कांदाचाळ अनुदान योजना आहे. या योजनेचा अर्ज लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाईन भरावा लागतो.

कांदाचाळ अनुदान योजना DPR

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin (Mahad DBT) या पोर्टल वरती अर्ज करावा लागतो. शेतकऱ्याची योजनेसाठी निवड झाल्यानंतर ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करावी लागतात. कागदपत्रे अपलोड करताना शेतकऱ्यांना Kandachal DPR (Detailed Project Report) सोबत जोडावा लागतो. अनेकांना प्रश्न पडतो कि हा DPR म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये कोणकोणती माहिती द्यावी लागते?

DPR म्हणजे काय?

डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल. कोणत्याही प्रकल्पासाठी शासन किंवा बँकेकडून आर्थिक मदत मिळवायची असल्यास त्यामागील नियोजन, खर्चाचा अंदाज, तांत्रिक माहिती, लाभार्थ्याचा तपशील इ. माहिती व्यवस्थित लिहलेला म्हणजे DPR होय. सध्या भाषेत सांगायचं झाल तर, एखादा प्रकल्प व्यवहार्य आहे व त्यावर खर्च झालेला पैसा वाया जाणार नाही हे दाखवून देणारा पुरावा म्हणजे DPR.

Kadachal Anudan Yojana DPR

DPR क्षमताकांदाचाळ
25 (MT)डाऊन+लोड
20 (MT)डाऊन+लोड

कांदाचाळ योजनेसाठी DPR मध्ये काय असते?

यामध्ये बांधण्यात येणाऱ्या चाळीमध्ये किती क्विंटल कांदा साठवला जाऊ शकतो म्हणजेच साठवणुकीची क्षमता दिलेली असते. त्याचबरोबर कांदाचाळ तांत्रिक रचना चाळीची, लांबी, रुंदी, उंची, हवेशीर व्यवस्था असते. बांधकामावर होणारा एकूण खर्च, त्यातील शेतकऱ्याचा वाटा आणि शासनाकडून मिळणारे अनुदान याचा तक्ता इ माहिती असते.

कांदाचाळ बांधण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी DPR खूप महत्वाचा आहे. यामुळे प्रकल्पाचा लाभ खर्च शेतकऱ्याला होणार आहे कि नाही हे तपासण्यासाठी उपयोग होतो. शेतकऱ्याला स्वत:च्या प्रकल्पाचे नियोजन स्पष्ट समजण्यासाठी उपयोग होतो. कांदाचाळ अनुदान योजनेसाठी DPR हा केवळ औपचारिक दस्तऐवज नसून शेतकऱ्याच्या प्रकल्पाचे नकाशा व आरखडा असतो. चांगला DPR तयार केल्याने अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढतेच शिवाय शेतकऱ्याला स्वतःलाही योग्य नियोजन करून प्रकल्प यशस्वी रितीने राबवता येतो.

Kandachal Anudan Yojana Documents

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • फार्मर आयडी
  • मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • निवड झाल्यानंतर DPR (Detailed Project report)

Similar Posts

Leave a Reply