Maha us Nondani app घरबसल्या ऊसाची नोंद लावा मोबाईलवरून
Maha Usa Nondani Online : नमस्कार शेतकरी बंधूंनो आपणास जर ऊसाची नोंद कारखान्यात लावायची असेल तर सातबारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स काढण्याची गरज नाही.
आता शेतकरी मोबाईल वरून ऊसाची नोंद करू शकतात. मोबाईलवरून ऊसाची नोंद लावण्यासाठी प्ले-स्टोर वरून महा ऊस नोंदणी ॲप घ्यायचे आहे.
महा ऊस नोंदणी?
“महा ऊस नोंदणी” ॲपवरून नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि होणारा खर्च सुद्धा वाचणार आहे.
महा ऊस नोंदणी ॲपबद्दल माहिती? | Maha Usa Nondani Online
- महा ऊस नोंदणी (MAHA US Nondani App) हे ॲप साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे.
- ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊसाची नोंद करणे शक्य नसल्यास ते MAHA US Nondani App च्या माध्यमातून ऊसाची नोंद मोबाईल द्वारे करू शकतात.
- शेतकऱ्यांना साखर कारखान्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी नोंद केली याची सुद्धा माहिती पाहता येणार आहे.
Maha-USa nondani वरती ऊसाची नोंद कशी करावी?
प्रथम प्लेस्टोरवरून MAHA US Nondani App घ्या.
ॲप सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना पाच टप्प्यात माहिती भरायची आहे.maha-usa nondani app download
ऊस नोंद करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती.
- ऊस क्षेत्र असलेल्या ठिकाणची माहिती.
- ऊस लागवडीची माहिती.
- कोणत्या कारखान्यास नोंद द्यायची आहे.
- स्वयंघोषणापत्र
ऊसाची नोंद करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती.
प्रथम आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल, नंतर आपला आधार कार्ड नंबर आपले नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव न चुकता भरावे आणि पुढे बटन वर क्लिक करा.
ऊसाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणची माहिती.
यामध्ये आपले उसाचे क्षेत्र कोणत्या गावात आहे याबद्दल माहिती देयची आहे.
प्रथम आपला जिल्हा निवडावा नंतर आपला तालुका, गाव आणि आपला शेतीचा गट नंबर इत्यादी माहिती भरा.
ऊस लागवडीची माहिती. | maha us nondani
यामध्ये आपण उसाची लागवड केव्हा केली तसेच ऊसाचा प्रकार कोणता आहे. ऊसाची जात ऊस लागवडीचा दिनांक आणि ऊस maha us nondani in marathi लागवडीचे क्षेत्र ‘गुंठ्यात’ टाकून घ्यावे.
कोणत्या कारखान्यात नोंद द्यायची आहे.
तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले आहेत, आपल्याला कोणत्या कारखान्यात उसाची नोंद द्यायची आहे त्या कारखान्यांची नावे निवडावी.{maha us nondani app}
स्वयंघोषणापत्र.
स्वयंघोषणापत्र वाचून “ऊस क्षेत्राची माहिती नोंदवा” पर्याय वर क्लिक करा. धन्यवाद आपण सादर केलेली माहिती यशस्वीरित्या साखर कारखान्यांना कळवली आहे. असा मेसेज पहायला मिळेल.
ऊसाची नोंद स्वीकारली आहे किंवा नाकारली आहे हे पाहण्यासाठी मुख्य पृष्ठावर खालच्या बाजूला ऊस नोंदणी पर्यायावर क्लिक करा नंतर आपला मोबाईल नंबर टाकावा पुढे बटन वर क्लिक करावे. आपण केलेल्या नोंदीचे स्टेटस पाहायला मिळेल.
ॲप घेण्यासाठी | येथे क्लिक करा |
सीमा भागातील शेतकरी चा उस नोदणी या अॅप वर होत नाही
मार्गदर्शन करावे