Maha DBT पोर्टल योजना काय आहे? : MahaDBT Farmer

MahaDBT Farmer

MahaDBT Farmer : नमस्कार शेतकरी मित्रहो तुमच्यासाठी महत्वाची माहिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने/शासनाने Maha DBT पोर्टल सुरु केले आहे.

MahaDBT Farmer Scheme

काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकरी योजनेसाठी mahadbt farmer अर्ज करायचा असल्यास त्यांना कृषी विभागाकडे ऑफलाईन तसेच ऑनलाईन विविध पोर्टल/वेबसाईट वरती अर्ज करावा लागत असे.

यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे उदा. उत्पन्न दाखला तसेच इतर कागदपत्रे तयार करून अर्जासोबत जोडावे लागत होते. यामध्ये शेतकऱ्याचा खूप वेळ वाया जात होता आणि प्रत्येक घटकासाठी वेगळा अर्ज करावा लागत होता.

उदा. औजारे, यंत्र, बियाणे,खते, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कांदाचाळ इ. तसेच अर्ज केल्यानंतर अर्ज मंजूर झाला कि नाही व अर्जाची सद्यस्थिती पाहता येत नव्हती.

MAHADBT Farmer पोर्टल काय आहे?

शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी अर्ज करताना नवीन वैयक्तिक कागदपत्रे जोडावी लागत. यामुळे शेतकऱ्याला लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. शेतकरी एकच अर्ज विविध घटकासाठी करू शकतो. म्हणजेच अर्ज एक योजना अनेक यामध्ये प्रत्येक घटकासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. एकाच अर्जामध्ये शेतकरी विविध योजना विविध घटकासाठी करू शकतात.

शेतकऱ्यांना कसा फायदा होईल?

  • शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही, घरी बसून मोबाईल वरून अर्ज करू शकतात. {mahadbt farmer}
  • अर्ज करीत असताना अर्जासाठी लागणारे दाखले काढण्याची गरज नाही. निवड झाल्यानंतर आवश्यक राहील.
  • अर्ज मंजूर झाल्यानंतर सत्यप्रत/झेरॉक्स बंधनकारक राहतील.
  • अर्ज करण्यापासून ते लाभ मिळेपर्यंत संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन असेल.
  • शेतकऱ्यांचा वेळ वाया जाणार नाही. आणि जास्त खर्च सुद्धा होणार नाही.

MAHA DBT पोर्टल बाबत महत्वाची माहिती?

योजना सुरु कोणी केलीमहाराष्ट्र शासन
अर्ज कोठे करावाMAHA DBT Portal
MahaDBT Farmer

Similar Posts

One Comment

  1. मला कांदा चाळ पाहिजे मला कांदा चा

Leave a Reply