Namo Shetkari Yojana; अखेर शेतकऱ्यांना मिळणार १२००० रु दरवर्षी पहा
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता सुरु होणार आहे, योजनेचा नवीन शासन निर्णय आला आहे, कोणते शेतकरी पात्र असणार? लाभ कसा घ्यायचा? १२ हजार रु दरवर्षी कसे मिळणार? तसेच योजनेची सविस्तर माहिती यालेखात दिलेली आहे.
Namo Shetkari Yojana
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, वर्षाला १२ हजार रु शेतकऱ्याला कसे मिळणार? :- तर पीएम किसान (PM-Kisan) सन्मान निधी योजनेतून (केंद्र सरकार) पात्र लाभार्थी शेतकऱ्याला प्रती वर्ष ६ हजार रु दिले जातात. तसेच आता शेतकऱ्यांना “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ६ हजार रु दिले जाणार आहेत.
पीम किसान सन्मान निधी योजना – ६००० रु + नमो शेतकरी महासन्मान निधी योजना- ६००० रु असे एकूण १२००० रु शेतकऱ्यांना प्रती वर्षाला दिले जाणार आहेत. दि.१५ जून २०२३ रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय आलेला आहे.
योजनेचे नाव | नमो शेतकरी महासन्मान निधी योजाना |
लाभार्थी शेतकरी | महाराष्ट्र राज्य |
शासन निर्णय दिनांक | १५ जून २०२३ |
मिळणारा लाभ | प्रती वर्ष ६००० रु |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रस्तावास ३०/०५/२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली असून, सन २०२३-२४ पासून हि योजना राज्यात राबविली जाणार आहे.
Namo Shetkari Samman Nidhi Yojana Online Apply
शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी/अर्ज करू शकता. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळत आहेत अशा सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनेचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Sanman Yojana Registration) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा नवीन अर्ज भरण्याची गरज नाही, शेतकऱ्याला जर पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल आणि तो योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx या साईटवर नोंदणी/अर्ज करू शकतात.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार
या योजेनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रती वर्ष सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. (namo shetkari samman nidhi) पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांना योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्याच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जनार आहे.
हप्ता क्रमांक | कधी येणार हप्ता | रक्कम रु. |
---|---|---|
१ | माहे एप्रिल ते जुलै | २०००/- |
२ | माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर | २०००/- |
३ | माहे डिसेंबर ते मार्च | २०००/- |
नमो शेतकरी योजनेचा अपात्र शेतकऱ्यांनी जर लाभ घेतल्यास त्याच्याकडून मिळालेल्या लाभाची संपूर्ण रक्कम हि महसूल यंत्रणे द्वारे वसूल करण्यात येणार आहे. तसेच वसूल केलेली रक्कम हि आयुक्त (कृषी) यांच्याकडे जमा केली जाईल.