MahaDBT Farmer Scheme 2024; एकाच अर्जाद्वारे घ्या अनेक योजनांचा लाभ
MahaDBT Farmer Scheme 2024 : शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे. अर्ज करण्यासाठी प्रत्येक घटकासाठी शुल्क भरावे लागत नाही. MahaDBT Farmer Scheme सर्व योजनांमधील घटकाची निवड केल्यानंतरच सेवा शुल्क भरावे लागते.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असे पोर्टल आहे.
MahaDBT Farmer Scheme 2024
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योजनेकरिता अर्ज करणेसाठी महाडीबीटी शेतकरी Mahadbt Farmer scheme registration पोर्टल वरती नवीन शेतकरी नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतरच योजनेसाठी अर्ज करता येईल. शेतकरी स्वतः किंवा जवळील ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून योजनेसाठी अर्ज/फॉर्म भरू शकतात. शेतकऱ्यांना या पोर्टलचा नक्कीच फायदा होणार आहे. शेती संबधित अनेक योजनांचा या पोर्टल वरती समावेश आहे. एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे.
mahadbt.maharashtra.gov.in
योजना | MahaDBT/महाडीबीटी शेतकरी योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्य शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ |
MahaDBT Portal वरती कोणत्या योजनांचा समावेश आहे.
महाडीबीटी पोर्टल वरती कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन हे तीन मुख्य पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे.
कृषी यांत्रिकीकरण-Krushi Yantrikikaran Up Abhiyan
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार
- कृषी यांत्रिकीकरण उप अभियान
कृषी यांत्रिकीकरणमध्ये शेतकरी, शेती संबधित यंत्र व औजारे – Tractor, पॉवर टिलर, फलोत्पादन यंत्र औजारे, प्रक्रिया संच, औजारे बँकेची स्थापना, काढणी पश्चात तंत्रज्ञान, स्वयंचलित औजारे, स्प्रेयर, बैल चलित औजारे, वैशिष्ट्यपूर्ण औजारे, पेरणी यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्र, पाचटकुट्टी, कडबाकुट्टी मशीन, रोटाव्हेटर, नांगर, मल्चर इ. शेती संबधित औजारे यंत्राकरिता अर्ज करू शकतात.
सिंचन साधने व सुविधा
- राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य तेलबिया, कापूस, ऊस व कापूस
सिंचन साधने व सुविधा यामध्ये शेतकरी ठिबक सिंचन (Thibak Sinchan Yojana Online Application), तुषार सिंचन, डीझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोटार, सिंचन पंप, पाईप, शेततळे, सामुहिक शेततळे इ. करिता शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकतात. ठिबक सिंचन करिता शासन ८०% अनुदान देते.
फलोत्पादन-Falotpadan Yojana
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
फलोत्पादन या ऑप्शनमध्ये प्रकल्प आधारित, इतर घटक -फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बाजार सुविधा स्थापन करणे, कांदाचाळ, बाग लागवड, हरीतगृह, प्लास्टिक इ. (सरांक्षित शेती) एकात्मिक पोषकद्रव्य व कीड व्यवस्थापन शीतगृह, प्रीकुलिंग, प्रक्रिया प्रकल्प इ. घटकाचा योजनेमध्ये समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना-Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
स्वावलंबन योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी लागू असेल. योजनेमधून शेतकरी वैयक्तिक सिंचन – नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, सौर उर्जा पंप, इनवेल बोरिंग, शेततळ्यास अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सिंचन घटक, पंपसंच इ. घटकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये समावेश आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजनाबाह्य/आदिवासी उप योजना) – Birsa Munda Krishi Kranti Yojana (Tribal Sub Plan / Outside Tribal Sub Plan)
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन घटक, इनवेल बोरिंग इ. घटकाचा योजनेमध्ये समावेश आहे.
MahaDBT Farmer Scheme अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- PAN कार्ड
- सातबारा उतारा ८ अ
- अर्जदार अनु.जाती, अनु. जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
{MahaDBT} शेतकरी योजना पात्रता
- अर्जदाराचे नाव ७/१२, ८ अ वरती असणे गरजेच आहे.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.
- पूर्वसंमती मिळण्यापूर्वी कोणत्याही वस्तूची खरेदी/काम सुरु करू नये.
- निवड झाल्यानंतर कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करावीत.
- योजनानुसार पात्रता निवडीचे निकष लागू असतील.
दरीबडची या. जत जि. सांगली
दरीबडची जत सांगली
Draribachi shahaji babaji Mane the mahindra
Draribachi shahaji babaji Mane
Tractor
Aplya sarv yojna khup Chan Sundar ahet gor garib jantes labhdai ahet mlahi vyavsay krayche ahe mi aplya yojnecha labharti hohu shakto ka MLA avd ahe vyavsay kraychi
Welcome sir, Thank you…!
Aapan Yojanecha labh gheu shakta.