या महिलांना मिळणार 1500 रुपये प्रत्येक महिन्याला | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलांसाठी शासन विविध योजना राबविते, आता शासनाकडून राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. कोणत्या महिलांना १५०० रु. मिळणार, यासाठी पात्रता काय असेल? अर्जाची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे इ. सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी हि योजना “Majhi Ladki Bahin Yojana” सुरु केली आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, निराधार महिला, विधवा, घटस्पोटीत महिला इ. दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे, यासाठी दरवर्षी ४६००० कोटी ची तरतूद करण्यात येणार आहे. (ग्रामपंचायत घरकुल यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा) योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून होईल.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
अंमलबजावणीजुलै २०२४ पासून
लाभार्थी वर्गमहाराष्ट्र राज्यातील महिला
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज कुठे करायचायोजनेच्या अधिकृत पोर्टलवर
योजनेचा शासन निर्णयपहा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र

राज्यातील महिलांसाठी शासनातर्फे दर महिन्याला १५०० रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा अर्थ संकल्पामध्ये करण्यात आली. राज्यामधील २१ ते ६५ वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमधून १५०० देण्यात येतील असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा केली.

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

  • लाभार्थी कौटुंबिक वार्षिक उत्पन हे २ लाख ५० हजार पेक्षा कमी असावे.
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • किमान २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, घटसस्फोटीत, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • लाभार्थीचे बँक खाते पासबुक
  • उत्पन दाखला (२ लाख ५० हजार रु. पर्यंत) किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड
  • जन्म दाखला किंवा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षापूर्वीचे १)रेशन कार्ड २)मतदार ओळखपत्र ३)जन्म दाखला ४)शाळा सोडल्याचा दाखला
  • रेशन कार्ड
  • योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, लाभार्थी ऑनलाईन पोर्टलवरती किंवा मोबाईल App द्वारे अर्ज करू शकतात, तसेच आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र येथे जावून आपला अर्ज भरू शकतात. अर्ज लवकरच सुरु होतील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लवकरच वेबसाईट पोर्टल/App लॉंच सुरु केले जाईल.

Similar Posts

Leave a Reply