PM Kisan New Registration; पीएम किसान योजनेसाठी येथून नवीन फॉर्म भरा

pm kisan new registration

PM Kisan New Registration : पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६ हजार रु. दिले जातात. ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केलेला नाही ते शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या लेखामध्ये काय आहे.

PM Kisan New Registration

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी “PM Kisan New Registration” शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शेतकरी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत ६००० रु येत आहेत, त्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी शेतकरी https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx या पोर्टल वरती ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करू शकतात.

PM Kisan Samman Nidhi Yojana 2024 Online Apply

ऑनलाईन अर्ज/नोंदणी (pm kisan yojana) करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही. तसेच नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, ७/१२ उतारा, ८अ, मोबाईल नंबर इ. माहिती/कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Similar Posts

2 Comments

  1. मेरा पी एम किसन का एक मी किस्त मुझे नहीं आया है

Leave a Reply