PM Kisan : योजनेचा बँक खाते नंबर आता दिसणार नाही
Bank account number not showing in pm kisan : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पोर्टल वरती वेळोवेळी बदल करण्यात येत आहे. पोर्टल वरती झालेला बदल आपण पाहू शकता.
PM kisan Yojana New Updates
शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान योजनेचा १२ हप्ता मिळाला आहे. तसेच pm kisan योजनेच्या पोर्टल वरती खूप बदल करण्यात आले आहेत. यामध्ये महत्वाचा बदल म्हणजेच आता शेतकऱ्यांना स्टेटस चेक केल्यानंतर स्टेटस मध्ये बँक खाते नंबर दिसणार नाही. Account Number समोर NA दिसणार आहे.
शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. स्टेटस मध्ये जर बँक खाते नंबर दाखवत नसेल तर आपला २००० रु हप्ता ज्या बँकेत आधार कार्ड NPCI सर्व्हर शी लिंक असेल त्याच बँकेत मिळणार आहे. पुढील मिळणारे हप्ते DBT (Direct Benefit Transfer) मार्फत पाठवण्यात येणार आहेत.
परंतु स्टेटस चेक केल्यानंतर Payment Mode : Aadhaar असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या आधार लिंक बँक खात्यात पुढील हप्ते मिळणार आहेत.
महत्वाचे : शेतकऱ्यांना २००० रु हप्ता कोणत्या बँकेत मिळाला आहे. त्या बँकेचे नाव, खाते नंबरचे शेवटचे चार अंक स्टेटस मध्ये दिसणार आहे.