वारस नोंद अर्ज मोफत डाउनलोड करा; Varas Nond Arj in marathi
Varas Nond Arj in marathi : एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या नावे असणारी संपत्त्ती मध्ये वारसांची नोंद करणे गरजेचे असते. या लेखात आपण वारस नोंद कशी करायची त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? अर्ज कुठे करायचा याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.
Varas Nond Arj in Marathi
७/१२ वरील वारस नोंद करण्यासाठी अर्जदाराला तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागतो. शासनाने आता हि सुविधा ऑनलाईन सुरु केली आहे. अर्जदार ऑनलाईन पद्धतीने वारस नोंद करण्यासाठी अर्ज करू शकतात (वारस नोंद ऑनलाईकशी करायची पहा). तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराने, वारस नोंद अर्जाचा नमुना भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून तलाठी कार्यालयात अर्ज जमा करावा लागतो.
वारस नोंद अर्ज नमुना (७/१२) | डाउन+लोड करा |
ग्रामपंचायत अंतर्गत घराची जागा अथवा मोकळी जागा, घर इ. वारस नोंद करण्यासाठी अर्जदाराला ग्रामपंचायतकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
वारस नोंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे (७/१२)
- वारस नोंद अर्जाचा नमुना, चौकशी अहवाल
- वारसदाराचे प्रतिज्ञापत्र
- मृत्यू दाखला
- वारसांचा ओळखीचा पुरावा
- ७/१२, ८अ
- रेशन कार्ड
- संबधित फेरफार उताऱ्याची नक्कल