AH Mahabms Document Upload; नाविन्यपूर्ण योजना आत्ताच हे काम करा
AH mahabms document upload : आपण जर शेळी-मेंढी, गाई-म्हैस गट वाटप योजना, कुक्कुटपालन, एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करणे इ.योजनेसाठी आपण अर्ज केला असेल तर आपल्यासाठी महत्वाची माहिती.
AH Mahabms Document Upload
योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आलेले आहेत, परंतु जर तुम्हाला मेसेज एसएमएस आलेला नसेल तर आपण https://ah.mahabms.com/ पोर्टल वरती लॉग इन करून चेक करू शकता. ज्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेज आलेले आहेत, त्यांनी पोर्टल वरती आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२३ पासून पोर्टल वरती पर्याय देण्यात आला आहे. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम दि. ०८ डिसेंबर २०२३ असणार आहे. AH Mahabms Document Upload यामुळे ज्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एसएमएस आला आहे, त्यांनी विहित कालावधीमध्ये कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
योजनेसाठी नवीन अर्ज सुरु सुरु झाले आहेत, ज्या नागरिकांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. नवीन अर्ज दि.०९ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु झाले आहेत, नवीन अर्ज करण्याची अंतिम मुदत ०८ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. २०२३-२४ मध्ये नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार स्वतंत्र कालावधी दिला जाणार आहे.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पोर्टल वरती पर्याय देण्यात आला आहे. मुदत संपल्यानंतर कागदपत्रे अपलोड ऑप्शन दिसणार नाही. यामुळे विहित कालावधीमध्ये लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड करावी.
योजना | नाविन्यपूर्ण योजना |
कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत | ०८ डिसेंबर २०२३ |
Navnath Mohite
Sir mi sheli palan cha form bhrla ah mla sms Aala nh ah
पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करा सर