E Pik Pahani Last Date; ई पिक पाहणी करण्यासाठी मिळाली मुदतवाढ
e pik pahani last date 2023 : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, अखेर खरीप हंगामाची पिक पाहणी “e pik pahani last date” करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. खरीप पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत पहा सविस्तर माहिती.
e pik pahani last date 2023
पिक पाहणी करण्यासाठी या पूर्वी शेतकऱ्यांना गाव कामगार तलाठी यांच्याकडे जावून पिकाची नोंद करावी लागत असे, परंतु शेतकऱ्यांना आता मोबाईल मधून ई पिक पाहणी अँप द्वारे आपल्या पिकाची नोंद तसेच कायम पड, चालू पड, विहीर, बोरवेल, शेततळे इ. नोंदी सुद्धा शेतकऱ्यांना मोबाईल वरून करता येत आहेत.
राज्यात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा भरलेला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या (e pik pahani last date) पिकाची नोंद हि ७/१२ वरती करणे गरजेचे आहे. ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई/विमा मिळू शकतो.
पिक पाहणी करण्याचा कालावधी हा १ ऑगष्ट २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ (एकूण ४५ दिवस) असा होता. आता यामध्ये बदल करण्यात आला आहे, पिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची नोंद हि ७/१२ वरती लावणे गरजेचे आहे. खरीप हंगाम ई पिक पाहणी करण्यासाठी शासनाने दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतू आता शेतकऱ्यांना २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत खरीप हंगामातील ई पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
E Peek Pahani App Problem
पिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना जर अँप मध्ये काही अडचण येत असेल तर खालील टिप्स वाचा. पिक पाहणीसाठी नोंदणी करताना अडचण येणे, मोबाईल वरती ओटीपी न येणे, ई पिक पाहणी अँप ओपन होत नाही.
जर वरील प्रमाणे अडचण येत असेल तर सर्वप्रथम आपण प्ले-स्टोर वरून ई-पिक पाहणी व्हर्जन – २ हे अँप इन्स्टाँल करावे.
- पिक पाहणी करताना फोटो/कँमेरा ओपन होत नसेल तर अँप सेटिंग मधून कँमेरा अनुमती द्या/Permission Allow करा.
- अक्षांश/रेखांश येत नसेल तर पुन्हा अँप सेटिंग मधून लोकेशन/Location अनुमती द्या/Permission Allow करा.
ई पिक पाहणी 2023
खरीप हंगाम २०२३ पासून पिक पाहणी मध्ये केंद्र शासनाच्या सुचनाप्रमाणे नवीन बदल (ई-पिक पाहणी मोबाईल अँप मध्ये Customize) करण्यात आले आहेत. काही शेतकरी इ पिक पाहणी जुन्या अँपमधून पिक पाहणी करीत आहेत. यामुळे पिक पाहणी करताना अडचणी येत आहेत. पिक पाहणी करताना जर अडचण येत असेल तर शेतकऱ्याने प्ले-स्टोर वरून ई पिक पाहणी व्हर्जन २ हे अँप इन्स्टाँल करावे.