सोलर पंप योजना नवीन अपडेट; Kusum Solar Yojana 2024

kusum solar yojana

kusum solar yojana 2024 : पीएम कुसुम सोलर पंप योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता सेल्फ सर्व्हे करावा लागणार आहे, पहा सविस्तर माहिती.

kusum solar yojana 2024

मागील काही दिवसापूर्वी कुसुम सोलर पंप योजेनेचे फॉर्म ऑनलाईन सुरु झाले असून शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कुसुम महाउर्जाच्या अधिकृत साईटवरती आपला अर्ज सादर करावा. काय आहे नवीन बदल? अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांना काही दिवसानंतर पेमेंट करण्यासाठी पर्याय दिला जात होता. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.

अर्ज भरल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्याला पेमेंट करण्यापूर्वी एक सेल्फ सर्व्हे करावा लागणार आहे. सेल्फ सर्व्हे केल्यानंतर शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही हे त्याठिकाणी दाखवले जाईल. शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिसेल. शेतकऱ्याने सेल्फ सर्व्हे करताना कोणतीही चुकीची माहिती भरू नये, अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार येणार नाही.

Mahaurja Kusum Solar Pump Yojana-योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आला?

पीएम कुसुम सोलर पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना पूर्वी डायरेक्ट पेमेंट करता येत होते.

परंतु आता शेतकऱ्यांना पेमेंट करण्यापूर्वी सेल्फ सर्व्हे Self Survey करावा लागणार आहे. म्हणजेच आता डायरेक्ट पेमेंट करता येणार नाही.

लाभार्थी शेतकऱ्याला Meda Beneficiary या ॲपच्या माध्यमातून सर्व्हे करावा लागेल. ॲपची लिंक शेतकऱ्यांना मेसेजद्वारे पाठविली जाते. परंतु तुम्हाला आलेला मेसेज हा शासनाकडूनच आला आहे का? याची खात्री करा व नंतरच लिंक वर क्लिक करावे. (kusum solar yojana survey)

सर्व्हे मध्ये काय विचारले जाते?

  1. इतर योजनेचा लाभ/फायदा घेतला आहे का?
  2. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे का?
  3. शेतकऱ्याला सर्व्हे मध्ये ज्या ठिकाणी तुमचा पाण्याचा स्त्रोत आहे तेथील शेतकऱ्यासोबत फोटो अपलोड करावा लागेल.
  4. फक्त पाण्याचा स्त्रोताचा फोटो.
  5. ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे तेथील फोटो.
  6. लाभार्थी शेतकऱ्याची सही.

Similar Posts

Leave a Reply