MahaDBT Lottery List; येथून पहा महाडीबीटी लॉटरीची नवीन लिस्ट/यादी

MahaDBT Lottery List

MahaDBT Lottery List : अनेक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. महाडीबीटी पोर्टल मुळे शेतकरी योजनेसाठी अर्ज करणे सोपे झाले आहे. एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.

MahaDBT Lottery List

महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यामध्ये निवड झाल्यास त्यांना एसएमएस द्वारे कळविले जाते. “mahadbt farmer list” शेतकऱ्याची निवड झाल्यांनतर संबधित योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावी लागतात.

कागदपत्रे ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड केल्यानंतर कागदपत्राची पडताळणी केली जाते, व शेतकऱ्याला पूर्व संमतीपत्र (Sanction Letter) दिले जाते. जरी शेतकऱ्यांना निवड झालेला एसएमएस आला नाही तरी शेतकरी मोबाईल वरून निवड झालेल्या शेतकऱ्यांची लिस्ट पाहू शकतात.

शेतकऱ्याची योजनेमध्ये निवड झाली आहे का हे चेक करण्यासाठी यापूर्वी पोर्टल वरती लॉगीन करून चेक करावे लागत असे, परंतु आता लॉगीन न करता शेतकरी निवड झालेल्या शेतकऱ्यांची लिस्ट मोबाईल वरती काढू शकतात. त्यामध्ये आपली निवड झाली का हे चेक करू शकतात.

महाडीबीटी लॉटरी लिस्ट मोबाईलवरून कशी पहायची.

MahaDBT Farmer Lottery List 2025

महाडीबीटी लॉटरी लिस्ट/निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी मोबाईल वरून पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व प्रथम मोबाईलमध्ये https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin हि साईट ओपन करावी. शेतकऱ्यांना आता अर्जदार यादी, निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी, प्रतीक्षा यादी, निधी वितरीत लाभार्थी यादी असे पर्याय पाहायला मिळतील.

  • साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालील फोटोप्रमाणे पर्याय दिसेल.
MahaDBT Lottery list
  • त्यामध्ये तुम्हाला महा-डीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य (FCFS) नुसार निवड यादी हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे.
  • डायरेक्ट वेबसाईट – https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FCFSSelectedListReport
  • योजना पर्यायामधून कोणत्या योजनेची लॉटरी यादी/निवड यादी पहायची आहे ती योजना निवडावी.
  • बाब प्रकारजिल्हातालुकागाव निवडून शोधा बटन वरती क्लिक करा. तुम्हाला योजनेची लॉटरी/निवड यादी पाहायला मिळेल.

यादीमध्ये शेतकरी आपले नाव चेक करू शकतात. सूचना पर्यायामध्ये लॉटरी दिनांक पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply