शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा : maharashtra government schemes for farmers

maharashtra government schemes for farmers

शासन विविध योजना संबधित विभागामार्फत राबविते. त्यासाठी शेतकऱ्यांना काही योजनेमध्ये तर ९५%, १००% अनुदान दिले जाते. मागील काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज भरावा लागत असे. परंतु आता एकाच अर्जामध्ये अनेक योजनासाठी फॉर्म भरता येणार आहे.

Maharashtra Government Schemes for farmers

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे सर्व योजनेसंबंधित लागणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामुळे योजना सुरु झाल्यानंतर कागदपत्रासाठी धावपळ करावी लागणार नाही. शेतकरी योजनांसाठी शासनाने महा डीबीटी पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी फॉर्म भरता येतो. परंतु सौर कृषी पंप योजनेकरिता शेतकऱ्यांना वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे. महा डीबीटी पोर्टल वरती सौर पंप योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही.

शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा?

सर्व प्रथम तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे निश्चित करा. यानंतर आपण www.farmerscheme.com या साईट वरती त्या योजनेची माहिती पहा, माहिती उपलब्ध नसल्यास अधिकृत साईट वरती माहिती चेक करा.

  • योजनेसाठी अनुदान किती असेल, पात्रता काय आहे, पात्रता निवडीचे निकष.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. सर्व कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत का?
  • अर्ज कुठे करावा, अर्ज करण्याची अंतिम मुदत किती आहे.

वरील सर्व बाबी लक्षात घ्या, नंतरच अर्ज भरण्याचा विचार करावा. महा डीबीटी (mahadbt) पोर्टल वरती शेती संबधित अनेक योजनाचा समावेश आहे. शेती संबधित सर्व औजारे, सर्व यंत्र, सिंचन संच, शेततळे,नवीन विहीर योजना, विहीर दुरुस्ती योजना, कांदाचाळ, पॉलीहाउस अशा अनेक योजनांचा महा डीबीटी पोर्टलमध्ये समावेश आहे.

ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

  • शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login शेतकरी योजनांची हि साईट ओपन करावी.
  • त्याठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी झाल्यानंतर (mahadbt login) अर्जदार लॉग इन करा.
  • आपली प्रोफाईल भरून घ्या, सर्व माहिती अचूक भरा, नंतर ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. हवी असलेली योजना निवडा.
  • नंतर अर्ज सादर करा आणि सेवा शुल्क भरा, आपला अर्ज हा यशस्वीरीत्या केला जाईल
  • काही दिवसानंतर लकी ड्राॅ काढला जाईल त्यामध्ये आपली निवड झाल्यास एसएमएस मेसेजद्वारे कळविले जाईल.
  • तसेच संबधित अधिकारी यांच्याकडे (mahadbt farmer list) यादी पाहायला मिळेल.
  • निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावी,
  • अपलोड केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल. आणि पूर्वसंमती पत्र पोर्टल वरती दिले जाईल. नंतर शेतकऱ्यांना वस्तू/औजार/यंत्राची खरेदी करता येईल.

पोर्टल वरती पुन्हा संबधित वस्तूची/यंत्राची बिले, इतर कागदपत्रे अपलोड करावी. आपण घेतलेले यंत्र, औजार याची प्रत्यक्ष तपासणी/ स्थळ पाहणी होईल. काही दिवसानंतर आधार कार्ड लिंक बँक खात्यात अनुदान जमा होईल.

मित्रांनो शेतकरी योजनांची माहिती आपल्या साईट वर उपलब्ध .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *