Mahaurja Username and Password; असे मिळवा युजरनेम आणि पासवर्ड कुसुम सोलर

Mahaurja Username and Password

Mahaurja Username and Password : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी कुसुम महाउर्जा साईट वरती नोंदणी झाल्यानंतर जर युजरनेम आणि पास+वर्ड “Mahaurja Username and Password” मिळाला नसेल तर हा लेख संपूर्ण वाचा,

Mahaurja Username and Password

शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, ज्या पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज सुरु झाल्यानंतर साईटवरती जास्त लोड असल्यामुळे काही वेळेस नोंदणी करताना, शुल्क भरताना अचानक साईट बंद पडते किंवा काही एरर येतो. पेमेंट झाल्यानंतर जर साईट बंद पडली तर ते पेज पुन्हा रीलोड करावे. रिफ्रेश करू नये.

महत्वाचे : मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा लेख खूप महत्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लेख पाठवा ज्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे सोपे जाईल. युजरनेम आणि पास+वर्ड मिळविण्यासाठी शेतकरी Meda च्या ऑफिसला जात आहेत. यालेखामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, मोबाईल वरून २ मिनिटामध्ये युजरनेम आणि पास+वर्ड मिळवू शकतात.

महाउर्जा कुसुम सोलर नोंदणी नंतर एसएमएसद्वारे युजरनेम आणि पास+वर्ड मिळाले नसेल तर काय करावे?

काही शेतकऱ्यांना युजरनेम आणि पास+वर्ड (mahaurja kusum solar pump yojana online registration) मिळाले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी कुसुम महाउर्जाच्या साईटवरती आपली नोंदणी झाली आहे का हे चेक करावे? कारण जर शेतकऱ्याची नोंदणी झाली तरच त्यांना युजरनेम पास+वर्ड मिळेल. अन्यथा मिळणार नाही. परंतु नोंदणी नंतर जर युजरनेम मिळाले नसेल तर खालील स्टेप फॉलो करून युजरनेम मिळवू शकता.

नोंदणी झाली आहे का? हे कसे चेक करावे?

  • मोबाईल मध्ये https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हि साईट ओपन करावी, त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर टाकावा. आपली नोंदणी झाली असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे पॉप-अप मेसेज दाखवला जाईल.
Mahaurja Username and Password
Mahaurja Username and Password
  • जर आपली नोंदणी झाली असेल तरच तुम्हाला युजरनेम आणि पास+वर्ड मिळणार आहे.

Kusum mahaurja com solar beneficiary register

कुसुम महाउर्जाच्या साईटवरती नोंदणी करताना आधार कार्ड नंबर, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर इ माहिती भरून १०० रु शुल्क भरले म्हणजे आपली नोंदणी झाली, असे नाही, १०० रु शुल्क भरल्यानंतर पुन्हा नोंदणी पेज वरती म्हणजे https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या पेज वरती “kusum mahaurja” नोंदणी करताना भरलेली माहिती पुन्हा भरून Submit Application बटण वर क्लिक करा, तुम्हाला उपलब्ध कोटा दिसेल त्यानंतर Proceed या बटन वरती क्लिक करा.

त्यानंतर ७/१२ माहिती भरावी लागेल. सातबारा माहिती भरल्यानंतर तुम्हाला Submit Application या बटण वरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकावा लागेल, ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पास+वर्ड चा एसएमएस येईल.

Mahaurja-युजरनेम आणि पास+वर्ड मिळाला नाही तर काय करावे?

  • शेतकऱ्याने सर्वप्रथम आपली नोंदणी झाली आहे का हे चेक करावे?
  • पेमेंट केल्यानंतर पुन्हा आपल्या समोर कुसुम महा उर्जाचे नोंदणी पेज ओपन झाले तर आपले पेमेंट यशस्वी झाले आहे.
  • सातबारा माहिती भरल्यानंतर Submit Application केल्यानंतर ओटीपी आला नसेल, नोंदणी झाली आहे का याची खात्री करा.

खालीलप्रमाणे जर आपले प्रश्न असतील तुम्हाला तुमचे {Mahaurja} युजरनेम आणि पास+वर्ड मिळेल.

  • नोंदणी करताना (mahaurja kusum online registration) ओटीपी आला नाही?
  • ओटीपी आला परंतु व्हेरीफाय झाला नाही?
  • ओटीपी व्हेरीफाय करताना साईट बंद पडली?
  • युजरनेम आणि पास+वर्ड मिळाले नाही परंतु नोंदणी झाली आहे?

खालील स्टेप फॉलो करून युजरनेम पास+वर्ड मिळवू शकता.

  • सर्वप्रथम मोबाईल मध्ये कुसुम महाउर्जा लॉगइन “mahaurja beneficiary login” https://kusum.mahaurja.com/beneficiary/ पेज ओपन करा.
mahaurja kusum solar pump yojana
mahaurja kusum solar pump yojana
  • 1) Forgot Password हा पर्याय दिसेल.
  • २) Resend Username& Password हा पर्याय दिसेल.

महत्वाचे : जर तुम्ही Resend Username & Password या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून Resend केले तर तुम्हाला युजरनेम Please enter valid credentials असा मेसेज दाखवला जाईल. युजरनेम मिळणार नाही.

  • यामुळे आपण सर्वप्रथम forgot password या पर्यायाचा वापर करणार आहोत.
  • त्यावर क्लिक करा आणि नोंदणी करताना दिलेला मोबाईल नंबर टाका आणि RESET वर क्लिक करा.
mahaurja kusum beneficiary login
mahaurja kusum beneficiary login
  • मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो टाकावा, आणि एक नवीन पास+वर्ड टाका ओटीपी टाकू शकता. पुन्हा तोच पास+वर्ड टाका व Reset Password वरती क्लिक करा.
kusum solar yojana
“kusum solar yojana”
  • आता आपण पास+वर्ड सेट केला आहे, परंतु आपल्याला युजरनेम मिळाले नसेल, युजरनेम मिळविण्यासाठी आपण पुन्हा लॉग-इन पेज ओपन करायचे आहे
  • आणि २) Resend Username and Password या पर्यायावर क्लिक करावे.
www.mahaurja.com kusum registration
www.mahaurja.com kusum registration
  • वरती दाखवल्याप्रमाणे नोंदणी करताना दिलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर RESEND ओटीपी वरती क्लिक करा आपल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे युजरनेम आणि पास+वर्ड मिळेल.

सर्व प्रथम पास+वर्ड RESET करावा लागेल त्यानंतरच RESEND करा, तरच एसएमएस मिळेल.

Similar Posts

6 Comments

  1. आधार नंबर टाकल्या नंतर नोंदणी झाली components B असा pop-up येतोय , पण forgot password केल्यानंतर मोबाईल नंबर enter केला असता , enter valid credentials असाच pop-up परत परत येतो, काय करायला पाहिजे ?

Leave a Reply