मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना 2024; Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024 : शेतकरी बंधुंनो आता पर्यंत आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना या योजना तुम्हाला माहितीच आहेत. पण मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना काय आहे. याची माहिती आम्ही याठिकाणी दिली आहे.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

शेतकऱ्यांकडे जर पडीक जमिन किंवा अतिरिक्त जमीन असल्यास, शेतकरी ती जमीन सौर प्रकल्पाकरिता शासनाला भाड्याने देऊ शकतात. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 शेतकऱ्याने जर १ एकर जमीन भाड्याने दिली तर त्याकरिता शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये भाडे दिले जाते.

१ हेक्टर जमीन भाड्याने दिल्यास शेतकऱ्याला वार्षिक १.२५ लाख हजार रुपये भाडे मिळणार आहे. आपण देत असलेल्या जमिनीच्या भाड्यामध्ये प्रती वर्ष ३% वाढ करण्यात येणार आहे.

जमीन भाड्याने देण्याकरिता काही अटी व शर्ती आहेत.

  • आपण देत असलेली जमीन हि अतिक्रमणमुक्त हवी, तसेच त्याजमिनीवर कोणतेही कर्ज घेतलेलं नसावे, कोणत्याही संस्थेचा त्यावरती बोजा नसावा तसे असल्यास अर्जदाराला जमीन कर्ज मुक्त, तारण मुक्त करून द्यावी लागेल.
  • महावितरण ३३/११ के.व्ही. उपकेंद्राजवळील जमिनींना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • भाडे तत्वावर देत असलेले जमिनीचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर असावे व जास्तीत जास्त ५० एकर पर्यंत असावे.
योजनेचे नावमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0
योजनेचे उद्दिष्टसोलर/सौर वीज प्रकल्प तयार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे.
अर्ज कोण करू शकतात?शेतकरी,
ग्रामपंचायत,
शेतकऱ्यांचा गट,
सहकारी संस्था,
जल उपसा केंद्र,
साखर कारखाने,
सरकारी/शासकीय जमीन असल्यासशासन निर्णयानुसार नाममात्र १ रु. च्या भाडेपट्टीवर जमीन ३० वर्षासाठी घेतली जाणार आहे.
अर्ज कुठे करावा.https://mskvy.mahadiscom.in/MSKVYSolar/
अधिक माहिती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.
mukhyamantri saur krishi vahini yojana

Similar Posts

Leave a Reply