शेळी मेंढी, गाई म्हैस, कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु : Navinya Purna Yojana 2023

Navinya Purna Yojana 2023

Navinya Purna Yojana 2023 : नाविन्यपूर्ण योजना सुरु झाल्या आहेत. यामध्ये शेळी मेंढी, गाई म्हैस, कुक्कुट पालन, तलंगा इ. समावेश आहे. या लेखात आपण योजनेबद्दल माहिती, अर्ज कोठे करावा, सतत विचारले जाणारे प्रश्न इतर महत्वपूर्ण संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत.

Navinya Purna Yojana 2023

शासन वेळोवेळी विविध योजना संबंधित विभागाच्या माध्यमातून राबवीत असते. पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध योजना सन २०२२-२३ करिता सुरु झाल्या आहेत. इच्छुक लाभार्थी त्याकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात.यामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजनांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय योजने मध्ये १) शेळी मेंढी गट वाटप करणे, २) दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, ३) तलंगा गट वाटप करणे, ४) एक दिवशीय सुधारित पक्षांचे पिल्लांचे वाटप करणे इ. घटकांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय योजने मध्ये १) दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, २) शेळी मेंढी गट वाटप करणे, ३) १००० मांसल कुक्कुटपक्षी संगोपानाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे या तीन घटकांचा समावेश आहे.

हि माहिती असणे गरजेचे आहे?

  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्याची मुदत दि. १३ डिसेंबर २०२२ दु. ३:०० वा पासून ते दिनांक ११ जानेवारी २०२३ रा. १२:०० वा पर्यंत अर्ज करता येईल.
  • नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका,नगरपंचायत कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाशी व्यक्तींना या योजना लागू नाहीत.
  • फक्त ग्रामपंचायत क्षेत्रातील/भागातील रहिवाशी व्यक्तींना सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  • ज्या अर्जदारांनी २०२१-२२ मध्ये अर्ज केला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. (सन २०२१-२२) सदर अर्ज पुढील पाच (सन २०२५-२६ पर्यंत) वर्षाकरिता ग्राह्य धरले जातील.
  • सर्वप्रथम २०२१-२२ वर्षातील अर्जदारांना प्रतीक्षाधीन यादी प्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न

अनुदान किती असेल?

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७५% अनुदान असेल, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदान असेल.

अर्ज कोठे करावा?

https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज करता येईल.

अर्ज केल्यानंतर निवड केंव्हा होईल?

प्राथमिक लाभार्थी निवड यादी १४ जानेवारी २०२३ ते १८ जानेवारी २०२३ मध्ये काढली जाईल.

अंतिम लाभार्थी यादी केंव्हा येईल?

दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी अंतिम लाभार्थी यादी तयार होईल.

कागदपत्रे केंव्हा अपलोड करावी?

निवड झाल्यानंतर दि. २० जानेवारी २०२३ ते २७ जानेवारी २०२३ या ८ दिवसात कागदपत्रे अपलोड करावी.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

आपण ज्या घटकासाठी अर्ज करणार आहात त्याघटकामध्ये पोर्टलवर कागदपत्रे यादी दिलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *