पीएम किसान योजना सर्वात महत्वाची अपडेट | PM Kisan Yojana KYC Last Date

PM Kisan Yojana KYC Last Date

PM Kisan Yojana KYC Last Date : शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती, आपण जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल म्हणजेच तुम्हाला वर्षाला ६००० रु मिळत असतील तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट.

आपण शेतकरी आहात आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहात, तर तुम्हाला आधार केवायसी करावी लागणार आहे. आपण जर केवायसी केली नाही तर पुढील २००० रु. हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाणार नाही.

पुणे : जे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असून सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत. अशा शेतकऱ्यांची भौतिक तपासणी केली जाणार आहे. तसेच KYC करण्यासाठी ०९ सप्टेंबर २०२२ हि अंतिम मुदत आहे.

या लेखामध्ये काय आहे.

PM Kisan Yojana KYC Last Date?

बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून पर्यंत केवायसी केलीली नाही. त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी. यामुळे पुढील २००० रु हप्ता मिळण्यास ते पात्र ठरतील.

केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदत वाढ मिळण्याची वाट पाहू नये. आपण जर केवायसी केली नाही, तर तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेतून काढून टाकले जाईल. आणि आपले पीएम किसान खाते INActive केले जाईल. आपले खाते INActive केल्यामुळे पुढील हप्ते मिळणार नाहीत.

  • तसेच ज्या शेतकऱ्यांचे भौतिक तपासणी यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते पासबुक, तसेच रेशन कार्ड, ७/१२, ८ अ उतारा इ कागदपत्रे भौतिक तपासणी फॉर्म सोबत जोडावी.
केवायसी करण्यासाठी आपल्या गावातील/जवळील  CSC महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन आपली केवायसी करून घ्यावी. आजच आपली केवायसी करून घ्यावी.

Similar Posts

Leave a Reply