सोलर पंप योजना निवड सुरु | फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पंप.
Kusum Saur Krushi Pump Yojana Maharashtra : मागील वर्षी कुसुम सौर कृषी पंप योजना सुरु झाली.
योजने अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म/ अर्ज भरले. परंतु त्यामधील काहीच शेतकऱ्यांची सौर पंपाकरिता निवड झाली. त्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आणि त्यांच्या शेतात सौर पंप कृषी पंप देखील स्थापित केला आहे.
कुसुम सौर कृषी पंप योजना | kusum saur krushi pump yojana maharashtra
कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. परंतु त्यांची कुसुम सौर कृषी पंप योजनेकरिता निवड झालेली नाही.
अशा शेतकऱ्यांना “सौर पंपाकरिता निवड झाली आहे” असे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना मेसेज/SMS आले आहेत. फक्त त्यांनाच सोलर पंप मिळणार आहेत्त.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सौर कृषी पंप योजनेकरिता ऑनलाईन फॉर्म भरले आहेत त्यांनी मोबाईल SMS तपासावे. तुम्हाला जर खालील प्रमाणे मेसेज आला असेल. तर आपली निवड झालेली आहे.
आपल्याला जर असा मेसेज SMS आला तर मेसेज/SMS ची खात्री करून आपण बँकद्वारे किंवा ऑनलाईन सेवा केंद्र याठिकाणी लाभार्थी हिस्सा भरू शकता.
भरणा करताना घ्यावयाची काळजी?
- महा उर्जा च्या अधिकृत संकेस्थळावर खात्री करूनच भरणा करावा.
- मोबाईल द्वारे आलेल्या कोणत्याही लिंक वरती क्लिक करून भरणा करू नये.
- माहितीदार व्यक्ती कडूनच ऑनलाईन भरणा करावा.
- भरणा करतेवेळी विद्युत पुरवठा खंडित न होण्याची काळजी घ्यावी.