फळबाग लागवड योजनेची लाभार्थी यादी जाहीर : falbag lagwad yojana 2023

falbag lagwad yojana 2023

falbag lagwad yojana 2023 : फळबाग लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, अशा शेतकऱ्याची लाभार्थी सोडत झालेली आहे. शेतकरी योजनेमध्ये निवड झाली का? व पुढे काय करावे? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

या लेखामध्ये काय आहे.

falbag lagwad yojana 2023

शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासन १००% अनुदान देते, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज केले आहेत. अशा शेतकऱ्यांची लाभार्थी सोडत झालेली आहे.

ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्यांना एसएमएस आलेले आहेत, जर एसएमएस आला नसेल तर आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला (आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र) त्याठिकाणी जाऊन शेतकरी चेक करू शकतात.

MahaDBT Login

शेतकऱ्याने जर मोबाईल वरून अर्ज भरला असेल तर शेतकरी https://mahadbtmahait.gov.in/Farmer/ येथे जाऊन लॉग ईन करून मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये अर्ज स्थिती यामध्ये जर winner असे दाखवत असेल तर आपली निवड झालेली आहे.

निवड झाल्यानंतर पुढे काय करावे?

योजनेमध्ये निवड झाल्यानंतर पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करा ऑप्शन मध्ये कागदपत्रे अपलोड करावी लागतील, कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२, ८अ स्वाक्षरीसहित, हमीपत्र, DPR इ. संबधित कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *